Sun, May 28, 2023

दिवा शहर मनसेकडून वर्धापनदिन साजरा
दिवा शहर मनसेकडून वर्धापनदिन साजरा
Published on : 23 March 2023, 12:03 pm
दिवा, ता. २३ (बातमीदार) : कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या दिव्यातील आमदार कार्यालयाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. चंद्रांगण रेसिडेन्सी येथे गतवर्षी मार्चमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. या कार्यालयाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त दिवा शहर मनसेकडून ‘अपना घर’ या वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वृद्धांना कपडे आणि जेवणाचे वाटप करण्यात आले. सोबतच या वृद्धाश्रमाला आर्थिक मदत म्हणून आमदार राजू पाटील यांच्या मासिक वेतानातून ५० हजार रुपयांचा धनादेश संस्थेच्या ट्रस्टींकडे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी सुपूर्द केला. या वेळी दिवा मनसेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.