केडीएमटीला प्राधिकरणाचे वेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडीएमटीला प्राधिकरणाचे वेध
केडीएमटीला प्राधिकरणाचे वेध

केडीएमटीला प्राधिकरणाचे वेध

sakal_logo
By

कल्याण, ता. २३ (बातमीदार) : नाजूक आर्थिक स्थितीशी झुंज देत असलेल्या कल्याण- डोंबिवली महापालिका परिवहन सेवेला आता प्राधिकरणाचे वेध लागले आहेत. पुणे महानगर परिवहनच्या धर्तीवर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदेच्या सहभागाने प्राधिकरण केल्यास केडीएमटीची ‘धाव’ वाढण्याचा विश्वास व्यक्त होत आहे. शिवाय या सेवेचा लाभ केवळ कल्याण-डोंबिवलीकरांनाच नव्हे तर शेजारील सर्व शहरांना होऊन उत्पन्न वाढ होण्यास मदत होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या माध्यमातून सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाचे (केडीएमटी) २०२२-२३ जमा १११ कोटी ८० लाख रुपये, तर खर्च १०८ कोटी ८४ लाख रुपये, शिल्लक २ कोटी ९५ लाख ३० हजार रुपये, तर २०२३- २०२४ मूळ अंदाज जमा १८४ कोटी ६९ लाख ८ हजार रुपये, खर्च १८१ कोटी ९९ लाख ७८ हजार रुपये, शिल्लक २ कोटी ६९ लाख ३० हजार रुपयाचे अंदाजपत्रक गुरुवारी परिवहन व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना सादर केले.

केडीएमटीच्या अंदाजपत्रकामध्ये नवीन घोषणा नसली तरी पुणे महानगर परिवहन नगरच्या धर्तीवर केडीएमटी प्राधिकरण उभारण्याचा संकल्प मांडण्यात आला आहे. केडीएमटीची आर्थिक परिस्थिती नाजूक असून, खर्चाला कात्री लावत व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांनी पुढील वाटचाल कशी असणार हे अंदाज पत्रकात मांडले आहे.

स्मार्ट केडीएमटी
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला असून, आगामी काळात प्रवाशांना मोबाईल ॲप, वेबसाईट, ई-तिकिट, १५० प्रवासी निवाऱ्यावर बस वेळापत्रक आणि बस कुठे आहे याची अत्याधुनिक पद्धतीने माहिती उपलब्ध होणार आहे.

इलेक्‍ट्रिक बस
इंधन दरवाढ आणि शहरातील वाढते प्रदूषण कमी व्हावे आणि शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शासन आदेशानुसार २०२१ ते २०२६ या पाच वर्षात २०७ पैकी लवकरच १४२ बस उपलब्ध होणार आहेत.

परिवहन नगर विकसित करणे
पालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षित भूखंड विकसित करून कर्मचारी वर्गाच्या उन्नतीसाठी विविध सुविधा आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे .