Thur, June 1, 2023

विजेच्या तारा चोरणाऱ्यांना अटक
विजेच्या तारा चोरणाऱ्यांना अटक
Published on : 23 March 2023, 10:53 am
कासा, ता. २३ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील कासा येथील भिसे विद्यालयाच्या मागील बाजूस वीज वितरणच्या तारा चोरीस गेल्याची घटना सोमवारी घडली होती. यामुळे काही तास वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. याप्रकरणी कासा चारोटी शाखा महावितरण अभियंता चंदन मोरे यांनी कासा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सोमवारी हा प्रकार झाला होता कासा पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरीवरून पोलिसांनी सोमटा कोडगाव येथे तार चोरी करणारे आरोपी असल्याचे कळले. यावरून तपास घेत असता संशयित चौघांना अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेली तारेसह नऊ हजार मुद्देमालदेखील जप्त केला. या चार चोरांमध्ये दोन जण यापूर्वी एका खासगी वीज वितरण ठेकेदाराकडे काम करीत होते.