Wed, June 7, 2023

वैतरणा खाडीत अनोळखी मृतदेह
वैतरणा खाडीत अनोळखी मृतदेह
Published on : 23 March 2023, 10:56 am
मनोर, ता. २३ (बातमीदार) : नांदगाव तर्फे मनोर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मस्तान नाका मनोर रस्त्यावरील राऊत वजन काट्यालगत वैतरणा नदीच्या पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आला. मृत व्यक्ती ४५ ते ५० वयोगटातील असून मनोर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. वैतरणा खाडीला आलेल्या भरतीत मृतदेह वाहून आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान अनोळखी मृतदेहाबाबत माहिती असल्यास मनोर पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन प्रभारी अधिकारी उमेश पाटील यांनी केले आहे.