पारसिक नगरातील खड्डा डोकेदुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारसिक नगरातील खड्डा डोकेदुखी
पारसिक नगरातील खड्डा डोकेदुखी

पारसिक नगरातील खड्डा डोकेदुखी

sakal_logo
By

कळवा, ता. २३ (बातमीदार) : खारेगाव पूर्व घोळाई नगर परिसरात असलेल्या अपर्णाराज सोसायटीच्या बाजूला एका भूखंडावर एका विकासकाने गेल्या सहा महिन्यांपासून खड्डा खोदून अर्धवट सोडून दिला आहे. या खड्ड्यात सध्या सांडपाणी साठून डासांची मोठ्या प्रमाणात पैदास निर्माण झाल्याने घोलाईनगरसह पारसिक नगर परिसरात सध्या डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डेंगी, मलेरियासह साथींच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. तरीही महापालिका कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने येथील कळवा पारसिक प्रवासी सामाजिक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पारसिक नगरातील खारेगाव पूर्व घोळाई नगर परिसरात काही भूमाफियांच्या वतीने अनधिकृत व बेकायदा बांधकामे केली जात आहेत. या बांधकामांसाठी हे भूमाफिया खोदकाम करीत असतात काही वेळा महापालिका कारवाई करीत असते. त्यादरम्यान खड्ड्यात साठवलेले पाणी व रेल्वेमार्गाच्या बाजूला असलेल्या गटाराचे सांडपाणी साठून राहते. त्यामुळे तेथे डासांची पैदास निर्माण होते. अपर्णाराज सोसायटीजवळ असलेल्या खड्ड्यात रेल्वे मार्गाच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीमधील कचरा, प्लास्टिक पिशव्या, खरकटे, मोठ्या प्रमाणात टाकल्याने हा कचरा या खड्ड्यात कुजला आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
परिसरातील नागरिकांनी तक्रार करूनही महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. सध्या काही ठिकाणी पाऊस पडत असल्याने काही ठिकाणी कचरा कुजला आहे. साथीच्या आजारातही वाढ झाली आहे. त्यामुळे या परिसरातील कचरा उचलण्याचे व हा खड्डा खोदणाऱ्या बांधकाम विकासकावर करवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

---------------------
खारेगाव पूर्व घोळाई नगर परिसरात खड्डा खोदून पाणी साठवण करणाऱ्या बांधकाम विकासकावर कारवाई करावी. तसेच साठलेला कचरा त्वरित न उचलल्यास याविरुद्ध आम्ही आंदोलन करू.
- सिद्धेश देसाई, अध्यक्ष, कळवा पारसिक प्रवासी सामाजिक संघटना

-----------------
खारेगाव पूर्व घोळाई नगर परिसरातील कचरा रोज उचलला जातो. ज्या ठिकाणी कचरा साचला असेल तेथे कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात येईल.
- संजीव रणदिवे, स्वच्छता निरीक्षक, ठाणे पालिका