
साडेदहा लाखांचे बनावट खाद्य उत्पादन जप्त
भिवंडी, ता. २३ (बातमीदार) ः तालुक्यातील वळगावात साडेसहा लाख रुपयांचे बनावट खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी शाहिद सय्यद अली याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वळगाव दापोडा रोडवरील प्रेरणा कॉम्प्लेक्सच्या गोदामात नूत्तेला फेरेरो हजेलनट स्प्रेड विथ कोकोआ या कंपनीच्या नावाने बनावट खाद्य उत्पादनाच्या प्रत्येकी १५ बॉटल असलेले २०० बॉक्स असल्याची तक्रार अश्विनी निजसुरे यांनी दिली होती. हे मूळचे खाद्य उत्पादन इटली येथील असून अश्विनी निजसुरे या त्याच्या अधिकृत प्रतिनिधी आहेत. या खाद्य उत्पादनाचे ब्रँड नाव अनधिकृतरीत्या वापरून बनावट कंपनी ग्राहकांचीही फसवणूक करत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. या उत्पादनामुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका उद्भवू शकतो, असे अश्विनी यांनी सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी या गोदामावर छापा टाकला.