दोघा अट्टल चोरांना अटक

दोघा अट्टल चोरांना अटक

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ ः कारागृहात ओळख झालेल्या तिघा चोरट्यांनी तिथून सुटताच पुन्हा चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. कल्याणमधील फ्लिपकार्टच्या गोडाऊनमधून त्यांनी तब्बल सव्वापाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे; तर एक जण फरार झाला आहे.

कल्याण पूर्वेत सूचक नाका परिसरातील एका फ्लिपकार्टच्या गोडाऊनमधील डिलिव्हरीसाठी ठेवलेला सव्वापाच लाखांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे उघडकीस आले होते. सीसीटीव्हीमध्ये चोरीची घटना कैद झाली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे व पगारे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. या चोरांनी चोरलेल्या तीन मोबाईलपैकी एक मोबाईल सुरू झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याचा माग काढला असता हा मोबाईल जालना येथे असल्याचे समोर आले. तेथून राहुल पंडित याला अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता सागर शिंदे व अमन खान या दोघांची नावे कळाली. यातील सागर शिंदे याला पकडण्यात पोलिसांना यश आले. तर अमन खान पसार होण्यात यशस्वी झाला. हे तिघे कारागृहात शिक्षा भोगत होते. तिथेच तिघांची मैत्री होऊन त्यांनी चोरी करण्याची योजना आखली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com