Thur, June 1, 2023

विमानात मद्यपान करणारे दोघे अटकेत
विमानात मद्यपान करणारे दोघे अटकेत
Published on : 23 March 2023, 2:10 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबईच्या सहार पोलिसांनी दुबईहून मुंबईला जाणाऱ्या दोन प्रवाशांना मद्याच्या नशेत विमानात गोंधळ घातल्याप्रकरणी अटक केली आहे. ‘इंडिगो’ने तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी सहार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. दुबईहून बुधवारी (ता. २२) मुंबईला येणाऱ्या विमानात इंडिगो विमानातून (६ई १०८८) प्रवास करणारे दोन प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांना क्रू मेंबर्सने अनेकदा वर्तणुकीसंदर्भात सूचना केल्या होत्या. या सूचनांना न जुमानता त्यांनी विमानात मद्यपान सुरू ठेवले. एवढेच नाही, तर त्यांनी क्रू मेंबर्स आणि सहप्रवाशांना शिवीगाळ केली. त्यामुळे बेशिस्त वर्तनासाठी त्यांना सीआयएसएफ कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आले.