रूळ ओलांडताना आई-वडिलांसह चिमुकलीचा मृत्यू

रूळ ओलांडताना आई-वडिलांसह चिमुकलीचा मृत्यू

नालासोपारा, ता. २४ (बातमीदार) : रेल्वे रूळ ओलांडताना एक्स्प्रेसची धडक बसून आई-वडिलांसह तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना विरार रेल्वेस्थानकात गुरुवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास घडली. हे दाम्पत्य मूळचे बिहारचे असून, ते मजुरीचे काम करण्यासाठी विरारमध्ये आले होते. त्यांची ओळख अजून पटली नसून, विरार रेल्वे पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

रेल्वे रूळ न ओलांडता पादचारी पुलाचा वापर करण्याबाबत रेल्वेस्थानकांवर अनेकदा उद्‍घोषणा केल्या जातात; परंतु त्याकडे दुर्लक्ष करून अनेक प्रवासी शॉर्टकटचा मार्ग अवलंबत सर्रास रूळ ओलांडतात. विरार स्थानकात गुरुवारी रात्री तिघेही फलाट चारवरून फलाट पाचवर जाण्यासाठी पादचारी पुलाचा वापर न करता रूळ ओलांडून जात होते. त्याचवेळी या मार्गावरून जाणाऱ्या भरधाव एक्स्प्रेसची या तिघांना धडक बसली. यात त्यांचा मृत्यू झाला. मृतांमधील पुरुष २८, तर महिला २६ वर्षांची आहे. या तिघांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे विरार पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com