कळव्यातील ब्रिटिशकालीन पुलाची दुरुस्ती सुरू

कळव्यातील ब्रिटिशकालीन पुलाची दुरुस्ती सुरू

कळवा, ता. २४ (बातमीदार) : कळवा खाडीवरील नव्या पुलाच्या उद्‍घाटनानंतरही वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ठाणे महापालिकेने कळवा खाडीवरील दीडशे वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन पुलाची दुरुस्ती सुरू केली आहे. हा पूल दुरुस्त झाल्यावर नवी मुंबईतून ठाण्यात जाणाऱ्या वाहनांसाठी त्याचा एकेरी मार्ग म्हणून वापर करण्याचे वाहतूक विभागाचे नियोजन आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे त्रासलेल्या चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ब्रिटिशकालीन पुलावरून जाणाऱ्या वाहनांचा ताण पडत असल्याने दहा वर्षांपूर्वी दगडी पुलाचा कठडा आणि एका बाजूचे दगड कोसळल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने मोठ्या वाहनासाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यावरून फक्त दुचाकीची वाहतूक सुरू होती; मात्र त्यावरील लोखंडी रॉड हटवून रिक्षाचालक घुसखोरी करून त्यावरून वाहतूक करत होते. त्यामुळे सात वर्षांपूर्वी पुलाच्या दोन्ही बाजूने लोखंडी संरक्षण कठडा लावून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

कळवा खाडीच्या दुसऱ्या पुलावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ३६९ कोटी रुपये खर्च करून नवीन तिसरा पूल बांधण्यात आला; मात्र या पुलावरून ठाण्यातून नवी मुंबईला जाणाऱ्या वाहनांनाच फक्त प्रवेश दिल्याने ठाण्यात जाणाऱ्या वाहनांना जुन्या खाडी पुलावरून जावे लागते. त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या वेळी नवी मुंबईतून येणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे कोंडी होत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com