उन्नत मार्गावर गर्डर टाकण्यासाठी वाहतुकीत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उन्नत मार्गावर गर्डर टाकण्यासाठी वाहतुकीत बदल
उन्नत मार्गावर गर्डर टाकण्यासाठी वाहतुकीत बदल

उन्नत मार्गावर गर्डर टाकण्यासाठी वाहतुकीत बदल

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : एमएमआरडीएच्या वतीने ऐरोली-काटई नाका या उन्नत मार्गाचे काम सुरू आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजली सिग्नल येथे उन्नत मार्गावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी २५ ते २७ मार्चदरम्यान रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत गर्डर टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे या तीन दिवसांमध्ये बेलापूर मार्गिकेवर मुकुंद चौकीपासून भारत बिजली, शिवाजी फ्लोअर मिलपर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक मुकुंद पोलिस चौकी येथून रबाळे एमआयडीसी रस्त्याने महापे ब्रिजमार्गे वळवण्यात आल्याचे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी सांगितले.

कल्याणमध्येही उड्डाणपुलाचे गर्डर टाकणार
कल्याण (बातमीदार) : शहराच्या पश्चिमेला रेल्वे स्थानक परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत वलीपिर चौक ते महात्मा फुले चौकदरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्या उड्डाणपुलावर गर्डर टाकण्यासाठी २६ मार्चपर्यंत पहाटे १ ते ५ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी बंदी काळात पर्याय मार्गाचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.