कारला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
कारला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

कारला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

sakal_logo
By

कासा (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धानिवरी येथे कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी (ता. २३) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुंबई वाहिनीवर धानिवरी गावाजवळील हॉटेल परिसरात वळण घेत असलेल्या कारला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार आनंद नरेश कोरडा (वय २२) याच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला. दुचाकीवरील सहप्रवासी देवेंद्र रसाळ (वय २४) हा गंभीर जखमी झाला. कारचालक मुंबईहून गुजरातकडे जात असताना आंबोली येथे हॉटेलवर वळण घेत असताना दुचाकीस्वाराला दिसला नाही. अपघातातील जखमी देवेंद्र याला वापी येथील रुग्णालयात पाठवण्यात आले; तर आनंद याचा मृतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.