मुलुंडमध्ये शोभायात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये शोभायात्रा
मुलुंडमध्ये शोभायात्रा

मुलुंडमध्ये शोभायात्रा

sakal_logo
By

मुलुंड, ता. २५ (बातमीदार) ः प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे गुढी पाडव्याच्या निमित्ताने बुधवारी (ता. २२) शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवलिंग पालखी यात्रेचे भव्य आयोजनदेखील करण्यात आले. ही शोभायात्रा सकाळी नऊ वाजता निघाली. याप्रसंगी ब्रह्माकुमारी आणि ब्रह्माकुमार हे पांढरे वस्त्र परिधान करून सेवा केंद्राजवळ उपस्थित होते. सकाळी प्रजापिता ब्रह्माकुमारी यांच्या सेवा केंद्र येथून शिवलिंग पालखी प्रस्थान झाली. ही पालखी १० मिनिटे दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. या सोहळ्याची सुरुवात गौरव कॉर्नरचे सचिव वैती यांच्या हस्ते करण्यात आली. संजय महाकाळ हेदेखील या वेळी उपस्थित होते. याचे आयोजन सेवा केंद्राच्या संचालिका आणि राजयोगिनी छायादीदी यांनी केले होते.