Wed, June 7, 2023

पालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा
पालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा
Published on : 25 March 2023, 9:57 am
विरार, ता. २५ (बातमीदार) : वसई-विरार महानगरपालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत विरार येथील विवा महाविद्यालयात घनकचरा व्यवस्थापन विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा, सॅनिटरी वेस्ट हे चार कचऱ्याचे प्रकार समजावून सांगण्यात आले. त्याचबरोबर कचरा कमी करणे, कचऱ्याचा पुनर्वापर करणे व कचऱ्याची पुनर्निर्मिती करणे याबाबत माहिती देण्यात आली. या वेळी वसई-विरार शहरातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वारसा जतन करण्यासाठी, निसर्गाला मानवाकडून होणारा त्रास कमी करून प्रदूषणमुक्त, कचरामुक्त, आरोग्यदायी व निरोगी शहर बनवण्यासाठी कॉलेजमधील सर्व युवावर्गाने नेतृत्व करावे व आपले शहर स्वच्छ सुंदर शहर म्हणून नावारूपास येण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन विवा कॉलेज येथील कार्यशाळेत करण्यात आले.