पालघरमध्ये नागरिकांचे आरोग्य फुलले

पालघरमध्ये नागरिकांचे आरोग्य फुलले

प्रसाद जोशी, वसई
कुटुंबातील व्यक्ती गंभीर आजरी असल्यास आर्थिक जुळवाजुळव करणे हे अनेकांसमोर अडचणीचे ठरते. मात्र सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमुळे उपचार मोफत मिळत आहेत. यामुळे पालघर जिल्ह्यातील १० हजार ८८० लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून, गंभीर आजारात आर्थिक हातभार लागला आहे.
पालघर जिल्ह्यात अशा नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळतो. पिवळे, केशरी कार्डधारक व पांढरे रेशन कार्ड असलेली शेतकरी कुटुंबे लाभार्थी होऊ शकतात. पालघर जिल्ह्यात या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करून एकूण १८ रुग्णालयांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यात उपचार घेणे शक्य होत आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांना याचा फायदा मिळत आहे. या योजनेबाबत अधिकाधिक नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी पालघर जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम तसेच शहरी भागात जनजागृती केली जात आहे. त्यामुळे गंभीर आजराने त्रस्त असलेल्या गरिबांना याचा लाभ घेता येत आहे.
---------------------------------
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ गरजू रुग्णांना मिळावा म्हणून पालघर जिल्ह्यातील १८ रुग्णालये नोंदणीकृत करण्यात आली आहेत. या योजनेतून पाच लाखांपर्यंत उपचार मिळतात. आर्थिक दुर्बल घटकांनी याचा लाभ घ्यावा.
- भूमित जोगळेकर, जिल्हा प्रमुख, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना
---------------------------------
अडचण आल्यास
अधिक माहितीसाठी संपर्क १५५३८८ व १८००२३३२२०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------------------
आवश्यक कागदपत्रे
आयुष्यमान कार्ड, पिवळे अथवा केसरी रेशनकार्ड, ओळखपत्र
....
योजनेचे फायदे
महागडे उपचार मोफत
आरोग्य मित्रांकडून मार्गदर्शन
पात्र रुग्णांवर त्वरित उपचार
आवश्यक चाचण्या
--------------------------
कोणते उपचार
किडनी प्रत्यारोपण, कर्करोग, प्लास्टिक सर्जरी, हृदयविकार, ढोपरांचे प्रत्यारोपण ९९६ प्रकारच्या विविध आजारांवर महात्मा ज्योतिराव फुले योजनेतून उपचार केले जातात.
-----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com