Tue, June 6, 2023

राहुल गांधींविरोधात जिल्हाभर आंदोलन करणार
राहुल गांधींविरोधात जिल्हाभर आंदोलन करणार
Published on : 25 March 2023, 9:59 am
वाडा, ता. २५ (बातमीदार) : मोदी आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी जिल्हाभर तालुकानिहाय आंदोलन करणार असल्याचे भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते, असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते. मोदी या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू, डॉक्टर, इंजिनीअर, व्यावसायिक आहेत. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल, तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असेही पाटील यांनी पत्रकात नमूद केले आहे.