पेल्हार धरणाची २३ वर्षांनी सुरक्षा तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेल्हार धरणाची २३ वर्षांनी सुरक्षा तपासणी
पेल्हार धरणाची २३ वर्षांनी सुरक्षा तपासणी

पेल्हार धरणाची २३ वर्षांनी सुरक्षा तपासणी

sakal_logo
By

विरार, ता. २५ (बातमीदार) : वसई तालुक्यातील तत्कालीन नवघर माणिकपूर नगरपालिकेच्या मालकीच्या व नंतर महापालिकेकडे वर्ग झालेल्या पेल्हार धरणाची सुरक्षा तपासणी २३ वर्षांनंतर करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या नाशिक विभागाच्या जलसंपदा विभागाला शुल्क भरूनही या धरणाची सुरक्षा तपासणी रखडली होती. मात्र आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लघु पाटबंधारे विभागामार्फत या धरणाची पाहणी करण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.
पेल्हार धरणाला ४० वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण झालेला आहे. हे धरण जिल्हा परिषदेच्या २००१ मध्ये तत्कालीन नवघर माणिकपूर नगरपालिकेला हस्तांतरित केले होते. हे धरण ताब्यात घेताना नगरपालिकेने याची सुरक्षा चाचणी केली होती. त्यावेळी या धरणाच्या कामावर नगरपालिकेने जवळपास तीन कोटी रुपये खर्च केले होते. जिल्हा परिषदेने हस्तांतरित केलेल्या धरणची नगरपालिकेने धरणाची उंची वाढविल्यामुळे तीन एमएलडी पाणीसाठा वाढला. पूर्वी या धरणात सात एमएलडी पाणी होते. आता या धरणाची साठवणूक क्षमता दहा एमएलडी इतकी झाले आहे. पण आता २३ वर्षांनंतर महापालिकेने धरणाच्या सुरक्षा तपासणीकरिता वसई-विरार महापालिकेने सुरक्षा तपासणी समितीस कळविलेले होते. महाराष्ट्र शासनाच्या नाशिक जलसंपदा विभागाच्या माध्यमातून ही पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून देण्यात आलेली होती.
....
असे आहे धरण
पेल्हार धरण हे मातीचे असून या धरणाचे बांधकाम लघु पाटबंधारे विभागामार्फत १९७४ रोजी करण्यात आलेले होते. या धरणाची क्षमता ३.६८ दशलक्ष घनमीटर इतकी आह; तर बंधाऱ्याची लांबी ४३० मीटर इतकी व उंची २६ मीटर आहे. या धरणातून पालिकेला प्रतिदिन १० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत आहे.
==
धरणाच्या सुरक्षेचा आढावा दरवेळी घेण्यात येतो. त्याचाच एक भाग असून, धरणाच्या दृष्टीने कुठे काही गळती किंवा इतर बाबी तपासणे गरजेचे असल्याने ही तपासणी आम्ही जलसंपदा विभागाकडून करून घेत आहोत.
- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई विरार महापालिका