झाडांना संजीवनी देणारे ‘निसर्ग वैभव’

झाडांना संजीवनी देणारे ‘निसर्ग वैभव’

नीलेश मोरे ः घाटकोपर

विकासाच्या नावाखाली निसर्गावर वारेमाप चालणारी कुऱ्हाड; तसेच निसर्गात होत असलेले बदल लक्षात घेत पृथ्वीला नवसंजीवनी मिळावी आणि झाडांचे संगोपन व्हावे, यासाठी घाटकोपरमधील निसर्ग वैभव फाऊंडेशनच्या माध्यमातून युवक निसर्गाच्या जतनासाठी पुढे आले आहेत.

संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या अभंगातून वृक्षवल्ली आम्हा सोयरी असे सुंदर शब्दात वर्णन केले आहे. मात्र असे असताना विकासाच्या नावाखाली निसर्गावर वारेमाप चालणारी कुऱ्हाड मानवाच्या आरोग्यावर त्याचे परिणाम घडवत आहे. गत काही वर्षात निसर्गात अनेक बदल होत असल्याने पावसाचे नियोजन वेळेत ठरत नसून थंडीत आणि उन्हाळ्यातदेखील अवकाळी पाऊस बरेच नुकसानकारक ठरत आहे.
निसर्ग वैभव फाऊंडेशनने घाटकोपरच्या खंडोबा टेकडीच्या ओसाड जागेवर आतापर्यंत २०० हून अधिक झाडे लावली आहेत. त्यात ४० प्रकारची भारतीय प्रजातीची झाडेदेखील लावण्यात आली आहे. त्यामुळे सध्या खंडोबा टेकडीवर निसर्गाची एक वेगळीच झलक पाहायला मिळत आहे. निसर्ग वैभव फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव ठाकरे यांनी पाच जूनमध्ये या फाऊंडेशनची स्थापना केली. महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात मरण पावलेल्या १२५ कर्मचारी यांच्या स्मरणार्थ फाऊंडेशनने ५० झाडे लावली. संस्थेने लावलेल्या दोनशे झाडांचे संगोपन फाऊंडेशनचे कार्यकर्ते दररोज मिळणाऱ्या वेळात एक तास काढून २० लिटर प्रत्येकी पाणी म्हणजेच १०० ते १५० लिटर पाणी वाहून नेले जाते. निसर्ग सेवेच्या मोहिमेत जवळ जवळ २० ते २५ सदस्य सध्या काम करत आहेत.

पुनर्रोपण केलेल्या झाडांचा वाढदिवस
फाऊंडेशनकडून लावण्यात येणाऱ्या झाडांचा दर वर्षी वाढदिवस साजरा केला जातो. या दिवशी खंडोबा टेकडीवर अवतीभवती स्वच्छता करून युवक त्या त्या झाडांसोबत सेल्फी घेऊन आपली आठवण जपतात. तसेच फाऊंडेशनचे युवक आपले आप्तेष्ट, स्वर्गवासी झाले असतील त्यांच्या आठवणीतसुद्धा एक झाड लावतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com