राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध

राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध

भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते, असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत केले होते. यासाठी सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याऐवजी राहुल गांधी रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत, अशी माहिती देत भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांनी शनिवारी (ता. २५) भिवंडीत धामणकर नाका येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आंदोलन केले.
अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना पोलिस यंत्रणेचा बेकायदा वापर करून केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या, खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा, अर्णव गोस्वामी, कंगना राणावत, केतकी चितळे यांच्यावर कारवाई केली. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य न करता राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस व अनेक पक्षांचे नेते न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. त्याविरोधात भाजप रस्त्यावर उतरली आहे, अशी माहिती आंदोलनाच्या वेळी भाजप भिवंडी जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली.
या वेळी ठाणे ग्रामीण महासचिव जितेंद्र ढाकी, संघटन महासचिव ॲड. हर्षल पाटील, उपाध्यक्ष सुमित पाटील, यशवंत टावरे, निष्काम भैरी, माजी नगरसेवक नीलेश चौधरी, महासचिव राजू गजेंगी, विशाल पाठारे, प्रदेश सदस्य प्रेषित जयवंत, नरेश करिजेनगुल यांनीही मनोगतातून राहुल गांधी यांचा निषेध केला. या वेळी भाजपचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com