संभाजी ब्रिगेडचे सोमवारी आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजी ब्रिगेडचे सोमवारी आंदोलन
संभाजी ब्रिगेडचे सोमवारी आंदोलन

संभाजी ब्रिगेडचे सोमवारी आंदोलन

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ ः राज्यातील विद्यार्थ्यांना मेगाभरतीच्या नावाखाली गाजर दाखवण्याचा प्रकार होत असताना दुसरीकडे सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे शेतकरी पुत्रांच्या हक्काच्या रोजगाराच्या संधी संपणार आहेत, असा आरोप करत संभाजी ब्रिगेड सोमवारी आझाद मैदानात निदर्शने करणार असल्याचे कळवण्यात आले आहे. राज्यातील तरुणाईच्या जनभावना लक्षात घेऊन सरकारने १४ मार्चला काढलेला कंत्राटी पद्धतीवरच्या भरतीचा निर्णय तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी आंदोलन करून शासन निर्णयाची होळी करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष ॲड. मनोज आखरे आणि महासचिव सौरभ खेडेकर यांनी केले आहे.