कामोठे खाडीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामोठे खाडीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
कामोठे खाडीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

कामोठे खाडीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

sakal_logo
By

नवी मुंबई (वार्ताहर) : कामोठ्यामधील विस्ता कॉर्नर येथील खाडीच्या नाल्यामध्ये शुक्रवारी (ता. २४) एका अज्ञात व्यक्तीचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळून आला. या व्यक्तीचा खाडीमध्ये बुडून मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख न पटल्याचे कामोठे पोलिसांकडून सांगण्यात आले. या मृत व्यक्तीचे अंदाजे ४० वय असून त्याची उंची साधारण साडेपाच फूट आहे. या व्यक्तीचा रंग गोरा असून त्याचा बांधा मध्यम आहे. त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी कामोठे सेक्टर २१ मधील विस्ता कॉर्नर येथील खाडीच्या नाल्यामध्ये आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे.