Tue, June 6, 2023

अग्निवीरांची पहिली तुकडी तयार
अग्निवीरांची पहिली तुकडी तयार
Published on : 25 March 2023, 4:22 am
मुंबई, ता. २५ : अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आऊट परेड २८ मार्चला मुंबईतील आयएनएस चिल्का येथे आयोजित करण्यात आली आहे. आयएनएस चिल्का येथे प्रशिक्षण घेत असलेल्या २७३ महिला अग्निवीरांसह जवळपास २६०० अग्निवीरांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. नौदलप्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार हे प्रमुख पाहुणे आणि पासिंग आऊट परेडचे पुनरावलोकन अधिकारी असतील. अग्निवीरांनी भारतीय नौदलाची खलाशांसाठीची प्रशिक्षण संस्था आयएनएस चिल्का येथे १६ आठवड्यांचे प्रशिक्षण घेतले. आयएनएस चिल्का येथील प्रशिक्षणामध्ये कर्तव्य, सन्मान आणि धैर्य या प्रमुख नौदल मूल्यांवर आधारित शैक्षणिक, सेवा आणि मैदानी प्रशिक्षण समाविष्ट होते.