क्षयदिनानिमित्ताने जनजागृती व सत्कार कार्यक्रम

क्षयदिनानिमित्ताने जनजागृती व सत्कार कार्यक्रम

भिवंडी, ता. २६ (बातमीदार) : जागतिक क्षयरोग दिन, राष्ट्रीय लसीकरण दिन आणि आशा दिन यानिमित्त भिवंडी-निजामपूर शहर महापालिका आणि भिवंडी पंचायत समितीअंतर्गत आरोग्य विभाग तथा क्षयरोग विभागातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भिवंडी महापालिकेच्‍या कार्यक्रमामध्ये तीन टी.बी. चॅम्पियन यांनी क्षयरोगाबद्दल मनोगत व्यक्त केले. आशा वर्कर यांनी संगीत गायन, पथनाट्य, मनोगत आणि नारी शक्तीबद्दल माहिती प्रस्तुत केली. या कार्यक्रमात भिवंडी पालिका कार्यक्षेत्रात उत्कृष्‍ट कामगिरी करणाऱ्या आशा वर्करना भिवंडी पालिकेचे आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास भिवंडी पालिकेचे आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त प्रणाली घोंगे, सहायक आयुक्त प्रीती घाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बुशरा सय्यद, आर.सी.एच. अधिकारी डॉ. वर्षा बारोड, डॉ. जयवंत धुळे तसेच नागरी आरोग्य केंद्राचे सर्व आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग तथा क्षयरोग विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com