कर्णबधिर विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित

कर्णबधिर विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित

किन्हवली, ता. २६ (बातमीदार) : किन्हवली येथील कर्णबधिर विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत विविध प्रकारचे मनोरंजन करत त्यांना सुग्रास भोजन देऊन मलबारी परिवाराने आनंद द्विगुणित केला. शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील अपंग सेवा संचलित कर्णबधिर विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांना आनंद मिळावा म्हणून मुरबाड तालुक्यातील शिवळे येथील विजय मलबारी, संजीवनी मलबारी, तेजस व सतेज मलबारी, शिवळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लक्ष्मण खोळंबे, सरपंच विनायक जाधव, उपसरपंच नरेश इसामे, सदस्य गुरुनाथ चौधरी व रमेश इसामे, जलसा ग्रुपचे केशव तुंगार, बाळकृष्ण इसामे, बळीराम पवार, प्राचार्य रत्नाकर सोनवणे आदींसह कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत मलबारी परिवार व पाहुण्यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com