नारी सेवासदन रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारी सेवासदन रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा
नारी सेवासदन रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

नारी सेवासदन रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २६ (बातमीदार) ः घाटकोपर पश्चिम येथील असल्फा गावातील नारी सेवासदन रस्ता गेल्या आठ महिन्यांपासून खोदलेला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना व वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम कासवाच्या स्वरूपात सुरू असल्याने पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण होईल का, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. याबाबत युवक काँग्रेसचे नेते चंद्रेश दुबे यांनी हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी पालिकेकडे केली आहे.
आठ महिन्‍यांपासून येथे काम सुरू असल्‍याने येथील दुकानदार, फेरीवाले व परिसरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. घाटकोपर पश्चिम मधील असल्फा गाव हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. सध्या असल्फा गाव भाजी मार्केट ते नारायण नगर एल. बी. एस. मार्गापर्यंतचा हा रस्ता महापालिकेने सिमेंटीकरणासाठी खोदला आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, अशी मागणी युवक काँग्रेस तसेच नागरिकांकडून केली जात आहे.