Tue, May 30, 2023

टेटवाळीत बांबू उद्योग कंपनीची स्थापना
टेटवाळीत बांबू उद्योग कंपनीची स्थापना
Published on : 26 March 2023, 10:34 am
विक्रमगड, ता. २६ (बातमीदार) : गुढीपाडवाच्या निमित्ताने नाबार्ड बॅंक आणि केशव सृष्टीमार्फत विक्रमगड बांबू उद्योग प्रोड्युसर लिमिटेड कंपनीची स्थापना टेटवाली येथे करण्यात आली. या कार्यक्रमासाठी नाबार्डचे चेअरमन सहजी के. व्ही. उपस्थित होते. केशव सृष्टीचे मार्गदर्शक बिमल केडिया, जिल्हा परिषद सदस्य संदीप पावडे, केशव सृष्टीचे सीईओ संतोष गायकवाड, टेटवाळीच्या सरपंच ज्योती माढा, केशव सृष्टी विक्रमगडचे सीईओ दिलीप घाटाल, प्रोजेक्ट ग्रीन गोल्ड प्रमुख गौरव श्रीवास्तव तसेच विक्रमगड येथील ग्रामीण बँकचे कर्मचारी उपस्थित होते. मुंबई येथील १५० कार्यकर्ते व विक्रमगड तालुक्यातील ३५० महिला-पुरुष या कार्यक्रमाला उपस्थित होते. या वेळी शालेय मुलींनी लेझीम नृत्य सादर केले. तसेच बांबू हस्तकला प्रशिक्षणार्थी महिलांनी स्वागतगीत आणि नाटक सादर केले.