मिरा रोड रेल्वे स्थानकाबाहेर चोवीस तास तिरंगा स्थापन करा

मिरा रोड रेल्वे स्थानकाबाहेर चोवीस तास तिरंगा स्थापन करा

भाईंदर, ता. २६ (बातमीदार) : मिरा रोड पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर कायमस्वरूपी तिरंग्याची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी मिरा भाईंदर महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे माजी वरिष्ठ नगरसेवक अनिल सावंत यांनी आयुक्त दिलीप ढोले यांना पत्र दिले आहे.
मिरा रोड रेल्वे स्थानकाबाहेर अतिशय आकर्षक अशी कमान उभारण्यात आली असून परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना हौतात्म्य पत्करलेले मेजर कौस्तुभ राणे स्मृतिस्तंभदेखील याच परिसरात उभारण्यात आला आहे. त्यामुळे हे ठिकाणी तिरंग्याची स्थापना करण्यासाठी अतिशय योग्य असून या ठिकाणी चोवीस तास डौलाने फडकत राहील, असा तिरंगा स्थापन करावा, असे सावंत यांचे म्हणणे आहे. अशा पद्धतीने चोवीस तास फडकत रहाणारा तिरंगा अन्य शहरात याआधी स्थापन करण्यात आला आहे. त्याच पद्धतीने मिरा भाईंदर महानगरपालिकेनेही यासाठी पुढाकार घ्यावा, असे अनिल सावंत यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com