वाढत्या रुग्णसंख्येवर लक्ष ठेवा!

वाढत्या रुग्णसंख्येवर लक्ष ठेवा!

मुंबई, ता. २६ ः कोरोना आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना केल्या आहेत.
गेल्या काही आठवड्यांत काही राज्यांमध्ये कोविड-१९ चाचण्या कमी झाल्या आहेत आणि जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या मानकांच्या तुलनेत सध्याची चाचणी पातळी अपुरी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सुचनेनुसार कोरोनासंदर्भात ठराविक चाचणी नियमित करणे महत्वाचे आहे. कोणत्याही नव्या विषाणूची ओळख पटवणे आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलण्यासाठी या चाचण्या महत्वाच्या असल्याचे केंद्राने म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्र आरोग्य विभागाने सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोना आणि इन्फ्लूएन्झाची परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
----
सुविधा उपलब्ध करा!
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांनुसार राज्यांनी सर्व रुग्णालयांमध्ये औषधे, सामान्य खाटांसह आयसीयू खाटा, वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय ऑक्सिजन, लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचे सांगितले आहे. तसेच लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यावरही भर देण्याचे नमूद करण्यात आले आहे.
---
१० व ११ एप्रिलला देशव्यापी मॉकड्रिल
आरोग्य मंत्रालयाद्वारे १० आणि ११ एप्रिल रोजी देशव्यापी मॉक ड्रिलचे नियोजन केले जात आहे. त्यामध्ये सर्व जिल्ह्यातील आरोग्य सुविधा (सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही) सहभागी होणे अपेक्षित आहे. २७ मार्च रोजी होणाऱ्या ऑनलाईन बैठकीत मॉक-ड्रिलचा तपशील राज्यांना कळवला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com