मुलीवर अत्याचार करणाऱ्या
आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

चेंबूर, ता. २६ (बातमीदार) : शेजारी राहणाऱ्या सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ३६ वर्षीय आरोपीला न्यायालयाने दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

चेंबूर येथील आरसीएफ पोलिस ठाण्याअंतर्गत हा गुन्हा २४ मे २०१४ रोजी घडला होता. दुपारच्या सुमारास पीडित मुलीच्या आईने तिला दुकानातून मिठाई आणण्याकरिता काही पैसे दिले होते. मात्र आरोपीने वाटेत तिला अडवून त्याच्या घरी नेत अत्याचार केला. त्यानंतर ती रडायला लागल्यावर आरोपीने तिला दोन रुपये दिले आणि अत्याचाराबाबत कोणाला काहीही सांगू नकोस, असे सांगितले. मुलगी रडत घरी परत आली, तेव्हा नातेवाईकांनी विचारपूस केली असता मुलीने घटनेबाबत माहिती दिली. मात्र आरोपीने मुलीच्या वडिलांना धमकावल्यामुळे पोलिस तक्रार करण्यात आली नव्हता.

काही दिवसांनी आरोपीने पीडितेच्या मोठ्या बहिणीला थांबवून तिचे नाव विचारले. मुलीने या प्रकाराची माहिती पालकांना दिल्यावर त्यांनी ३० मे २०१४ रोजी आरसीएफ पोलिसांशी संपर्क साधला. त्यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याच दिवशी आरोपीला अटक करण्यात आली होती. सरकारी वकील वीणा शेलार यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. अखेर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून १० वर्षांची शिक्षा ठोठावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com