कांजूरमार्ग परिसरातील इमारतीला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांजूरमार्ग परिसरातील इमारतीला आग
कांजूरमार्ग परिसरातील इमारतीला आग

कांजूरमार्ग परिसरातील इमारतीला आग

sakal_logo
By

भांडुप, ता. २६ (बातमीदार) : कांजूरमार्ग परिसरातील कर्वेनगर येथील म्हाडा कॉलनीतील एका इमारतीच्या १५व्या मजल्यावर आज (ता. २६) सकाळी आग लागली. या दुर्घटनेनंतर इमारतीमधील सर्व रहिवासी तत्काळ बाहेर आल्याने कोणतीही जीवितहानी घडली नाही; मात्र पाच महिलांना श्‍वसनाचा त्रास झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

कांजूरमार्ग पूर्वेतील कर्वेनगर परिसरातील म्हाडा कॉलनीतील पी ३ या इमारतीत रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या इमारतीत शॉक सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे रहिवाशांनी सांगितले. या आगीची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाल्यावर अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले; मात्र आगीचा धूर परिसरात पसरला होता. या धुराचा इमारतीतील पाच महिलांना त्रास झाल्याने त्यांना विक्रोळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मात्र इमारतीतील अग्निशमन यंत्रणा बंद असल्याने रहिवासी अशोक निकाळजे यांनी संताप व्यक्त करत, मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित केला.