मामा-भाचा डोंगरावर लागली आग

मामा-भाचा डोंगरावर लागली आग

ठाणे, ता. २६ (वार्ताहर) ः राष्ट्रीय उद्यानाच्या जवळील लोकमान्य नगर पाडा क्रमांक चारच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या मामा-भाचा डोंगरावरील जंगलात रविवारी (ता. २६ ) दुपारी १२ः३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

लोकमान्य नगर पाडा क्रमांक ४ च्या डोंगरावरती असलेल्या मामा-भाचाच्या डोंगरावर दाट झाडेझुडपे असून जंगल परिसर आहे. याला लागुनच राष्ट्रीय उद्यान आहे. रविवारी दुपारी अचानक मामा-भाचा डोंगरावर धुराचे लोळ उठले आणि आग लागली. या घटनेची माहिती श्रीनगर पोलिस ठाण्याचे शेलार यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि वनविभागाला कळवली. दरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर तब्बल दोन तासानंतर नियंत्रण मिळवले. आग कशी लागली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, दाट जंगल असल्याने घर्षणाने आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मामा-भाचा डोंगरावर वन्यप्राण्यांचाही वावर असल्याने शक्यतो डोंगरावर मनुष्य वावर कमी असतो. त्यामुळे आगीचे निश्चित कारण सांगता येत नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com