Wed, June 7, 2023

डोंबिवलीत ठाकरे गटाचे बॅनर फाडले
डोंबिवलीत ठाकरे गटाचे बॅनर फाडले
Published on : 26 March 2023, 3:31 am
कल्याण, ता. २६ (बातमीदार) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेसमोर गुढीपाडव्यानिमित्त फलक लावण्यात आले होते. हे फलक अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आले आहेत. याप्रकरणी शिवसेनेचे (ठाकरे) डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांनी डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत.