लेखक मनोज आचार्य यांचे निधन

लेखक मनोज आचार्य यांचे निधन

विरार, ता. २६ (बातमीदार) ः विरार येथील लेखक, चित्रकार मनोज आचार्य (वय ६१) यांचे आज (ता.२६) अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या मागे मोठा भाऊ, बहिण, भाचा व पुतण्या आणि सुन असा परिवार आहे. लेखिका वीणा गव्हाणकर, सायमन मार्टिन, अजित आचार्य यांनी मनोज आचार्य यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मनोज आचार्य यांनी जवळपास १२०० हून अधिक पुस्तकांची मुखपृष्ठे केली होती. सध्या ते बॅचलर इन्डेक्स प्रकाशन यांच्या मराठी प्रकाशनाचे काम पाहत होते. त्यांचा नवचैतन प्रकाशनाची पुस्तकांचे निर्मिती मध्ये सहभाग होता. त्यांनी अनेक पुस्तकांवर संपादकिय संस्कार केले होते. तसेच दिवाळी अंकामधून विविध विषयावर ते लेख लिहित असत. त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांनी अनेक शास्रीय गायकांवर लेख लिहिले होते. तसेच ते संगीताच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलनही ओघवत्या भाषेतून करत असत. आचार्य हे विठलनाथ संस्थानाच्या गीता ग्रँथालयातही काम पाहत होते. त्यांच्यावर विरार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोज आचार्य यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना प्रसिद्ध लेखिका वीणा गव्हाणकर यांनी सांगितले की, एक दिलदार व्यक्ती, संगीताची उत्तम जाण असलेला, तसेच उत्तम चित्रकार आणि मुखपृष्ठ तयार करणारा, साहित्याची जाण असलेला मनोज आपल्यातून निघून गेला आहे. जवळपास २०वर्षापासून मी त्याला जवळून ओळखत होते. त्याच्या जाण्याने साहित्य क्षेत्राची हानी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com