नाशिकमधील पदाधिकार्‍यांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिकमधील पदाधिकार्‍यांचा शिवसेनेत प्रवेश

मालेगावतील सभेपुर्वीच उद्धव ठाकरे यांना धक्का
- नाशिकमधील पदाधिकार्‍यांचा शिवसेनेत प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६- नाशिक आणि मालेगावातील उद्धव ठाकरे गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. ठाण्यातील आनंदआश्रमात झालेल्या कार्यक्रमात हातात भगवा झेंडा घेत या सगळ्यांनी पक्षप्रवेश केला. मालेगाव येथे उद्धव ठाकरे यांच्या होणार्‍या सभेपूर्वीच हा पक्षप्रवेश झाल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
ठाकरे गटाच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा मगर,
महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगला भास्कर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा गटकळ, माजी नगरसेविका अँड.श्यामला दीक्षित,
माजी नगरसेवक उत्तम दोंदे, प्रभाकर पाळदे, महिला आघाडी शहर समन्वयक ज्योती देवरे, माजी शिक्षण मंडळ सभापती उप महानगर प्रमुख शशिकांत कोठुळे, उप महानगर प्रमुख शरद देवरे,उपविभाग प्रमुख कुमार पगारे, उपविभाग प्रमुख पिंटू शिंदे,विधानसभा संघटक पश्चिम अनिता पाटील, उपविभाग प्रमुख आशाताई पाटील,शाखाप्रमुख सीमाताई पाटील यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला.

नाशिक जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न देखील सरकारच्या माध्यमातून नक्की सोडवण्यात येतील असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, महाराष्ट्र प्रदेश समन्वयक शिवसेना प्रवक्ते नरेशजी म्हस्के, सचिव भाऊसाहेब चौधरी, सह संपर्क प्रमुख राजू आण्णा लवटे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे हेदेखील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com