महिला, बाल विकास प्रकल्पांतर्गत पोषण पंधरवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला, बाल विकास प्रकल्पांतर्गत पोषण पंधरवडा
महिला, बाल विकास प्रकल्पांतर्गत पोषण पंधरवडा

महिला, बाल विकास प्रकल्पांतर्गत पोषण पंधरवडा

sakal_logo
By

कल्याण, ता. २७ (बातमीदार) : महिला आणि बालविकास, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कल्याण यांच्या वतीने पोषण पंधरवडा सुरू आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रकल्पाधिकारी प्रताप पाटील, मुख्य सेविका सुषमा खरात व रश्मी राऊत यांच्या मार्गदर्शनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या उपस्थितीत पोषण रॅली काढण्‍यात आली.

रॅलीमध्ये पोषण रथ तयार करण्यात आला. महिला आणि बाल विकास विभागाच्या ‘बेटी बचाव बेटी पढाव’, ‘बालविवाह बंदी’, ‘पोषण अभियान व अंगणवाडीमार्फत दिली जाणारी सेवा’ असे विविध बॅनर लावून रथ तयार केला होता. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह प्रकल्प अधिकारी प्रताप पाटील यांनी भेट देऊन अंगणवाडी सेविकांचा उत्साह वाढविला. तीन एप्रिलपर्यंत पोषण आहार पंधरवाडा होत असून, गर्भवती माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांना पोषक आहार किती महत्त्वाचा आहे, हे विविध स्पर्धेच्या माध्यमांतून पटवले जाणार आहे.