साझी मिट्टी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

साझी मिट्टी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

किन्हवली, ता.२७ (बातमीदार) : संपूर्ण देशात सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या साझी मिट्टी फाऊंडेशनने शहापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील टेंभुर्लीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा सराव केंद्र स्थापन केले आहे. त्याचे मान्यवरांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.
मुंबईसारख्या प्रगत शहरात बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन विदेशात मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी करत असताना देशप्रेमाची ओढ लागलेल्या आशिष श्रीवास्तव हे आपल्या मातृभूमीचे पांग फेडण्यासाठी मायदेशी परतले. त्यांनी स्थापन केलेल्या ‘साझी मिट्टी फाऊंडेशन’मार्फत संपूर्ण देशभरात सामाजिक, शैक्षणिक, कृषीविषयक उपक्रम राबविण्यात येतात. शहापूर तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या टेंभुर्ली येथील सह्याद्री विद्यालयातील दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा सराव केंद्र स्थापन करून त्याचे मान्यवरांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. विविध स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुढील उच्च शिक्षणाचीही जबाबदारी फाऊंडेशन घेणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com