Wed, May 31, 2023

ओंदेमध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा
ओंदेमध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा
Published on : 27 March 2023, 9:39 am
विक्रमगड, ता. २७ (बातमीदार) : तालुक्यातील ओंदे येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी १० वाजता अभिषेक, दुपारी १ ते ४ महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ८ भव्य पालखी मिरवणूक अशाप्रकारे स्वामी समर्थ प्रकटदिन साजरा करण्यात आला. संपूर्ण दिवसभर गावात उत्साहाचे, आनंदाचे व भक्तिमय वातावरण होते. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन श्री स्वामी समर्थ मठाचे व परिवाराचे प. पू. लक्ष्मीकांत दांडेकर (गुरुजी), अर्चना दांडेकर (माई) व परिवारातील इतर सदस्यांनी केले होते. पालखी सोहळ्यास नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील, विक्रमगड आदिवासी कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष मनोज पाटील यांच्यासह पालघर जिल्ह्यातील बहुसंख्य भक्तगण उपस्थित होते.