Sun, May 28, 2023

विक्रमगडमध्ये श्रीराम नवमी महोत्सव
विक्रमगडमध्ये श्रीराम नवमी महोत्सव
Published on : 27 March 2023, 10:26 am
विक्रमगड, ता. २७ (बातमीदार) : शहरात श्री रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विक्रमगड हायस्कूलच्या भव्य मैदानावर मंगळवार २८ आणि २९ मार्चला रामकथा कथन, सांस्कृतिक कार्यक्रम व हरिकीर्तन आणि महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत; तर गुरुवारी रामनवमीच्या दिवशी सायंकाळी ६.३० ते ७.१५ महा अभिषेक करण्यात येणार आहे. तसेच रात्री ७.१५ ते ९ राम कथा-कथन रात्री ९ ते ९.३० सांस्कृतिक कार्यक्रम व हरिकीर्तन, रात्री ९.३० महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.