विशेष मुलांसाठी ग्रीष्मोत्वस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशेष मुलांसाठी ग्रीष्मोत्वस
विशेष मुलांसाठी ग्रीष्मोत्वस

विशेष मुलांसाठी ग्रीष्मोत्वस

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : जागृती पालक संस्थेतर्फे विशेष मुलांसाठी दोनदिवसीय ग्रीष्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. २५ व २६ मार्च रोजी हा महोत्सव दादा कोंडके थिएटर येथे पार पडला. ठाणे जिल्ह्यातील एम.बी.ए. फाऊंडेशन, चैतन्य, स्नेहालय, विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट, जिव्हाळा ट्रस्ट- ठाणे, धर्मवीर आनंद दिघे विशेष मुलांची शाळा या सर्व संस्थांमधील विशेष मुलांनी यात सहभाग घेतला.

जागृती पालक संस्था ही गेल्या वीस वर्षांपासून विशेष मुलांसाठी कार्यरत आहे. संस्थेतर्फे वर्षभर मुलांकरिता नवनवीन उपक्रम राबवले जातात. यंदाच्या ग्रीष्मोत्सवात मुलांसाठी टाय अँड डाय, वॉल पेंटिंग, कागदी लगद्यापासून वस्तू निर्मिती, मातीकाम, ओरिगामी, अभिनय अशा विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमात मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या कार्यक्रमाचे उदघाटन नायकेम केमिकल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन राजे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमास विशेष मुलांसह शिक्षक आणि पालक देखील उपस्थित होते. या ग्रीष्मोत्सवास महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, एच.डी.एफ.सी. बँक मॅनेजर शर्मिष्ठा नवले, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, संतोष जयस्वाल, सतीश धुरत, नॅसी सेठना इत्यादी मान्यवर उपस्थित होते.