जेएसडब्ल्यू कंपनीत सहा लाखांची मालचोरी

जेएसडब्ल्यू कंपनीत सहा लाखांची मालचोरी

पेण, ता. २७ (वार्ताहर) : तालुक्यातील डोलवी येथील असणाऱ्या जेएसडब्ल्यू कंपनीतील फेरोनिओबियम स्टोअरमधून सहा लाखांची धातू चोरी केल्याप्रकरणी वडखळ पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. २० ते २१ मार्च दरम्यान जेएसडब्ल्यू कंपनीतील फेरोनिओबियम स्टोअरमधील २५० किलो वजनाचे फेरोनिओबियम धातूचे तुकडे कंपनीची परवानगी न घेता तीन जण घेवून जात होते. याप्रकरणी निशांत सनकाले यांनी त्यांना हटकून धातूने भरलेल्या गोण्या त्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघांनी गोण्यांसह पळ काढला होता. वडखळ पोलिसांनी या तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून २५० किलो वजनाचे तुकडे जप्त केले आहे. याची किंमत प्रती किलो २५०० रुपये असून एकूण सहा लाख रुपये किमतीचा माल आहे. या तिघांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक फौजदार दीपक मोरे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com