महेश आहेर यांच्या कार्यभारात कपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महेश आहेर यांच्या कार्यभारात कपात
महेश आहेर यांच्या कार्यभारात कपात

महेश आहेर यांच्या कार्यभारात कपात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : ठाणे महापालिकेने सहायक आयुक्त महेश आहेर यांच्याकडील कार्यालयीन उपअधीक्षक व त्यांच्याकडे कार्यालयीन अधीक्षक पदाचा असलेला अतिरिक्त कार्यभार काढून घेतला आहे. मात्र त्यांच्याकडील अतिक्रमण विभागाचा सहायक आयुक्त पदाचा कार्यभार कायम आहे.

ठाणे पालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यापासून जीवाला धोका असल्याची तक्रार काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पोलिसांत केली होती. त्यानंतर पोलिसांनी आहेर यांची चौकशी सुरू केली आहे. त्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत आहेर यांच्याविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर आहेर यांची चौकशी होईपर्यंत त्यांचा कार्यभार काढण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा निशाणा साधला आहे. आहेर यांच्याकडून सर्व पदभार काढून घेण्यात यावेत, असे पत्रात स्पष्ट नमूद आहे. पण मुख्यमंत्री सांगतात, फक्त एक पदभार काढा, विधिमंडळाच्या कामकाजात झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करतात, हे महाराष्ट्रात कधीच घडले नव्हते. अधिकाऱ्यांनी त्यांचे काम केले; पण मुख्यमंत्र्यांनी विभागास वेगळ्या सूचना केल्या, असे विभागाच्या पत्रात नमूद केले आहे. अधिकाऱ्यांची पाठराखण का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.