Wed, May 31, 2023

सीआयआय पश्चिम अध्यक्षपदी सिन्हा
सीआयआय पश्चिम अध्यक्षपदी सिन्हा
Published on : 27 March 2023, 2:00 am
मुंबई, ता. २७ : टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ प्रवीर सिन्हा यांची २०२३-२४ या वर्षासाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या पश्चिम (सीआयआय) क्षेत्राच्या अध्यक्षपदी; तर व्ही. एम. साळगावकर अँड ब्रदरच्या स्वाती साळगावकर यांची उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या पुनर्रचित पश्चिम प्रादेशिक परिषदेच्या पहिल्या बैठकीत त्यांची नावे जाहीर करण्यात आली.