गोव्याहून थेट दुबईला जाता येणार

गोव्याहून थेट दुबईला जाता येणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २७ : ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’तर्फे गोवा ते दुबई थेट विमानसेवा आजपासून सुरू करण्यात आली. गोवा येथून सोमवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी; तर परतीची विमानसेवा बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ही सेवा असणार आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय थेट विमानसेवेने गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (दाबोलिम विमानतळ) कामकाज सुरू करत असल्याचीही घोषणा केली आहे.

एअर एक्स्प्रेस बॅनरअंतर्गत गोव्याहून पहिली आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. दुबई ते गोवा अशी थेट सेवा देणारी पहिली विमानसेवा कंपनी असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. एअर एशिया इंडियाचे एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये विलिनीकरण होणार असून, ही कंपनी सध्या गोव्यापासून आणि गोव्यापर्यंत दैनंदिन १३ विमानसेवा पुरवत पाच देशांतर्गत शहरे जोडत आहे, अशी माहिती एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअर एशिया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अलोक सिंग यांनी दिली. गोवा राज्याच्या पर्यटन विकासाचा भाग होण्यासाठी व ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत असेही ते म्हणाले.

एअर इंडिया एक्स्प्रेसने गोव्यात प्रवेश केल्यानिमित्त सायंकाळी सिटी हॉटेल येथे आयोजित केलेल्या समारंभात ‘गोवा ट्रॅव्हल ट्रेड’ सहभागी झाले होते. या वेळी एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअर एशिया इंडियाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com