मोकाट कुत्र्यांची खारघरमध्ये दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोकाट कुत्र्यांची खारघरमध्ये दहशत
मोकाट कुत्र्यांची खारघरमध्ये दहशत

मोकाट कुत्र्यांची खारघरमध्ये दहशत

sakal_logo
By

खारघर, ता. २८ (बातमीदार) : खारघर सेक्टर ३५ परिसरात दोन शालेय मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून पालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
पनवेल पालिका हद्दीतील मोकाट कुत्र्यांचे पालिकेकडून निर्बिजीकरण केले जाते; मात्र निर्बिजीकरणानंतरही कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे. खारघर परिसरात सध्या मोकाट कुत्र्यांची दहशत नागरिकांमध्ये आहे. परिसरातील रस्त्यांवर सायकल, दुचाकीवरून जाणाऱ्यांच्या मागे हे श्वान लागत असल्याने अनेकदा किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी खारघर सेक्टर ३५ मध्ये दोन शाळकरी मुलांवरदेखील कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे पालिकेने श्वान निर्बिजीकरणासाठी एका एजन्सीची नेमणूक केली आहे; मात्र निर्बिजीकरण पथक कधीही दृष्टीस पडत नसल्याचा आरोप खारघरवासीयांकडून केला जात आहे.
--------------------------------------
खारघर सेक्टर ३५ रिलायन्स पॉइंट परिसरातील रस्त्यावर पंधरा ते वीस मोकाट कुत्र्यांचा कळप आहे. नुकताच या परिसरात दोन मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे पालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
- संदेश करणे, पदाधिकारी, हार्मोनी सोसायटी
----------------------------
पनवेल पालिकेकडून श्वान निर्बिजीकरणासाठी पथक नेमण्यात आले आहे. खारघर परिसरात लवकरच कारवाई केली जाईल.
- डॉ. बी. एन. गीते, पनवेल महापालिका