उत्सव चौकात अपघाताला निमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्सव चौकात अपघाताला निमंत्रण
उत्सव चौकात अपघाताला निमंत्रण

उत्सव चौकात अपघाताला निमंत्रण

sakal_logo
By

खारघर, ता. २८ (बातमीदार) : पालिकेचा आर्थिक स्रोत असलेले जाहिरात फलक सध्या सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरत आहेत. खारघरमधील उत्सव चौकातील वळणावर लावलेले डिजिटल फलक वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असून या फलकांमुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खारघर परिसरातील रस्त्यांवर सध्या मोठ्या संख्येने डिजिटल फलक लावले जात आहे. अशातच खारघरमधील सर्वात वर्दळीच्या अशा उत्सव चौकात डिजिटल फलक बसवण्यात येत आहेत. त्यामुळे चारही बाजूने ये-जा करणाऱ्या वाहनांना उत्सव चौकासमोरील मेट्रो पुलाखाली लावण्यात आलेल्या फलकांमुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे चौकातील फलक हटवावे, अशी मागणी खारघरवासीयांकडून केली जात आहे. याबाबत पालिकेच्या परवाना विभागाकडे विचारणा केली असता नागरिकांच्या तक्रारींमुळे हे कामकाज थांबवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
--------------------------------
पालिका आर्थिक हित लक्षात घेऊन खारघरमध्ये जाहिरातींसाठी शहराचे विद्रूपीकरण करत आहे. मात्र, हे फलक अपघाताला निमंत्रण देणारे फलक आहे. आयुक्तांनी या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- गुरुनाथ गायकर, माजी नगरसेवक
-------------------------
शासनाने जाहिरातींविषयी धोरण ठरवले आहे. तसेच शहरात लावण्यात येणाऱ्या फलकांवर न्यायालयानेदेखील ताशेरे ओढले आहेत. असे असूनदेखील पालिकेने खारघरमध्ये जाहिरातींसाठी सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे दिसून येते.
- अजित अडसूळ, सामाजिक कार्यकर्ता
-------------------------
वळणावरील फलक हे धोकादायक असतात. पालिकेने या ठिकाणी फलक लावू नये, असे पत्र पालिकेला पाठवले जाईल.
- योगेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, खारघर