प्रभादेवी रेल्वे स्थानकात सरकते जीने बसवण्याची मागणी

प्रभादेवी रेल्वे स्थानकात सरकते जीने बसवण्याची मागणी

प्रभादेवी, ता. २८ (बातमीदार) : प्रभादेवी रेल्वे स्थानकात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी स्थानकात सरकते जिने व लिफ्ट बसविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने केली आहे. पश्चिम रेल्वेवरील परळ व प्रभादेवी लोकल यांना जोडणारे हे रेल्‍वे स्थानक असल्यामुळे या स्थानकात प्रचंड गर्दी होते. ही गर्दी वाढत राहणार असून त्‍यासाठी येथे सरकते जिने व लिफ्ट बसविण्यात यावी, अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश परब यांनी पश्चिम रेल्वेच्या प्रबंधकांना दिले. या वेळी शरद शिरीषकर, राजेश बनसोडे, सुनील वराडकर आदी उपस्थित होते.
दादर रेल्वे स्थानकाबरोबर प्रभादेवी स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग, दिव्यांग, तसेच विद्यार्थी संख्‍या मोठ्या प्रमाणात आहे. प्रभादेवी स्थानकात सरकते जिने व लिफ्ट नसल्यामुळे प्रवाशांना अनेक समस्‍यांचा सामना करावा लागतो. विशेष करून गर्भवती महिला, ज्‍येष्‍ठ नागरिक, अपंग यांना फलाटावर येणे कठीण होत आहे. त्‍यांच्‍यासाठी सरकते जिने, लिफ्ट आवश्‍यक असून तातडीने प्रभादेवी स्‍थानकात या सुविधा द्याव्‍यात, अशी मागणी परब यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com