
करुणा गगे राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानित
किन्हवली, ता. २८ (बातमीदार) : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदिका व शिवव्याख्याती प्रा. करुणा गगे यांना नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनातील एका कार्यक्रमात राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शहापूर तालुक्यात किन्हवली परिसरातील फोफोडी येथील करुणा सचिन गगे यांना ग्रामविकास सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने २३ मार्च रोजी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील एका कार्यक्रमात भिवंडी लोकसभेचे खासदार व केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय कार्याध्यक्ष ठाकूर चंदन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष जयराम पलसानिया, बहुजन ग्रामविकास सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष सेवक नागवंशी, सरचिटणीस रामनाथ बोराडे आदींसह देशाच्या विविध प्रांतातील राष्ट्रीय सरपंच संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे पुरस्कारप्राप्त करुणा गगे यांनीच या पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन हिंदी व इंग्रजी भाषेतून अगदी खुमासदार शैलीत केले.