पालघरमध्ये उन्हाळी क्रीडा कौशल्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमध्ये उन्हाळी क्रीडा कौशल्य शिबिर
पालघरमध्ये उन्हाळी क्रीडा कौशल्य शिबिर

पालघरमध्ये उन्हाळी क्रीडा कौशल्य शिबिर

sakal_logo
By

पालघर, ता. २८ (बातमीदार) : उन्हाळ्यातील सुट्टीच्या काळातील खेळाडूंच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा संकुल समिती आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २० एप्रिल ते ५ मे कालावधी घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबिरामध्ये ६ ते १४ वयोगटातील खेळाडूंना प्रवेश दिला जाणार असून देशी व विदेशी अशा जवळपास १५ ते २० खेळांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. पालघर जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात हे शिबिर आयोजित केले जाणार आहे. या शिबिरामधून प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंमधून सर्वात्कृष्ट खेळाडू निवडले जातील. तरी याचा लाभ जास्तीत जास्त खेळाडूंनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, सुहास व्हनमाने यांनी केले आहे.