साधनासाठी ‘आदर्श’ची ‘सहकार’सोबत लढत

साधनासाठी ‘आदर्श’ची ‘सहकार’सोबत लढत

विरार, ता. २८ (बातमीदार) : वसईचे माजी आमदार डॉमिनिक घोन्सालविस यांनी स्थापन केलेल्या साधना सहकारी पतपेढीची पंचवार्षिक मंगळवार ४ एप्रिल रोजी होत आहे. या निवडणुकीमध्ये सहकार पॅनेल व आदर्श पॅनेल यांच्या चुरशीची लढत होणार आहे. या निवडणुकीत आदर्श पॅनेलची सुरुवात एक सदस्य बिनविरोध आल्याने त्यांचे खाते खोलले गेले आहे. साधना पतपेढीच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये नऊ जनरल जागांसाठी १८ उमेदवार, दोन महिला राखीव जागांसाठी चार उमेदवार, एक विशेष मागास प्रवर्गासाठी दोन उमेदवार, एक नागरिकांचा मागास प्रवर्ग वर्गासाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत सत्तारूढ पॅनेल हे अल्बर्ट अथाईत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे; तर आदर्श पॅनेल हे रोहन घोन्सालविस यांच्या नेतृत्वाखाली सामोरे जात आहे. या निवडणुकीत आदर्श पॅनेलचे अनुसूचित जाती-जमाती या वर्गातील उमेदवार विनायक वायडा यांची बिनविरोध निवड झाल्याने आदर्श पॅनेलने प्रथम विजय संपादित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com