Sat, June 3, 2023

वसईत काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन
वसईत काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन
Published on : 28 March 2023, 10:34 am
विरार, ता. २८ (बातमीदार) : वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भाजप आणि मोदी सरकारच्या भ्रष्टाचार, संविधानाचा अपमान, लोकशाहीची पायमल्ली आणि राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पापडी येथील हुतात्मा स्मारक येथे आंदोलन करण्यात आले.
राहुल गांधी यांच्यावर गुजरातमध्ये खोट्या केस दाखल करून मोदी सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष बिना फुट्यार्डो, विल्फ्रेंड डिसूझा, शेहजाद मलिक, महिला अध्यक्षा प्रवीणा चौधरी, माजी युवक अध्यक्ष कुलदीप वर्तक, हर्षद डबरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.